John 20:31 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हांला जीवन मिळेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु हे जे लिहिले आहे ते अशाकरता की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्‍वासाद्वारे त्याच्या नावात तुम्हांला जीवन प्राप्त व्हावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हांला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु हे यासाठी नोंदले आहेत की तुम्ही विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत व त्यांच्या नावावर विश्वास ठेवून तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे.