John 21:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीति करतोस का?” पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, ‘तू माझ्यावर प्रीति करतोस का?’ तो म्हणाला, “प्रभु, तुम्हांला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.” येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तिसऱ्यांदा त्याने त्याला विचारले, “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” ‘तू माझ्यावर प्रेम करतोस काय?’, असा प्रश्न प्रभूने तिसऱ्यांदा विचारल्यामुळे पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, “प्रभो, आपल्याला सर्व काही ठाऊक आहे. मी आपल्यावर प्रेम करतो, हे आपण जाणता.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिसर्‍यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय?” “माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिसर्‍या वेळेला त्यांनी त्याला विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” “तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍या वेळेस येशूंनी विचारल्यामुळे, पेत्र दुःखी झाला. तो म्हणाला “प्रभूजी, आपल्याला सर्वकाही माहीत आहे की मी आपणावर प्रेम करतो.” येशू म्हणाले, “माझ्या मेंढरांस चार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.”