John 21:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीति करीत असे, तो त्यांच्यामागे येत होता. (हा तोच होता, जो भोजनाच्या वेळी येशूजवळ बिलगून बसला होता. आणि म्हणाला होता. “प्रभु, तुझा विश्वासघात कोण करणार आहे?)” त्याला पाहिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्र मागे वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला त्याने मागे येताना पाहिले. भोजनाच्या वेळेस जो त्याच्या उराशी टेकला असता म्हणाला होता, ‘प्रभो, तुला धरून देणारा तो कोण आहे?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून “प्रभू, आपणाला धरून देणारा तो कोण आहे?” असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो त्यांच्यामागे येत होता असे त्याने पाहिले. भोजनाच्या वेळी येशूंच्या उराशी असता मागे वळून, “प्रभूजी, आपला घात कोण करणार आहे?” असे ज्याने विचारले होते तो हा शिष्य होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले.