John 21:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यावरून तो शिष्य मरणार नाही, असा समज बंधुवर्गामध्ये पसरला. तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, पण ‘मी येईपर्यंत त्याने राहावे, अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय’, असे म्हटले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून तो शिष्य मरणार नाही ही गोष्ट बंधुवर्गामध्ये पसरली; तरी ‘तो मरणार नाही’ असे येशूने त्याला म्हटले नव्हते; तर “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय?” असे म्हटले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या कारणाने, तो शिष्य मरणार नाही अशी अफवा विश्वासणार्यांमध्ये पसरली. परंतु तो मरणार नाही, असे ते म्हणाले नव्हते; येशू ख्रिस्त एवढेच म्हणाले होते, “मी येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असली, तर त्याचे तुला काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?”