John 21:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पहाट होत असता येशू सरोवराच्या काठावर उभा होता. तरी पण तो येशू आहे, हे शिष्यांनी ओळखले नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पहाट होत असता येशू समुद्रकिनार्यावर उभा होता; तरी तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहाटेच्या वेळी, येशू सरोवराच्या काठावर उभे होते, परंतु ते येशू आहेत हे शिष्यांना समजले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही.