John 21:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, ‘तो प्रभु आहे!’ असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्राला म्हणाला, “हा तर प्रभू आहे.” ‘प्रभू आहे’, हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घेऊन तो कमरेशी गुंडाळला, कारण तो उघडा होता आणि त्याने पाण्यात उडी टाकली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “हा प्रभूच आहे.” “प्रभू आहे” हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कंबरेला गुंडाळून घेतला, (कारण तो उघडा होता) आणि त्याने समुद्रात उडी टाकली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “ते प्रभू आहेत!” शिमोन पेत्राने, “ते प्रभू आहेत,” हे ऐकताच आपला अंगरखा कंबरेभोवती गुंडाळला, कारण त्याने तो काढून ठेवला होता आणि पाण्यात उडी मारली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली.