John 3:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्य वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला परंतु लोकांना प्रकाश नको होता. त्यांना अंधार पाहिजे होता. कारण लोक वाईट कृत्ये करीत होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे, परंतु माणसांना प्रकाशापेक्षा अंधार आवडला, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;