John 3:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योहान हा एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. एनोन गाव शालिमनगराजवळ आहे. तेथे भरपूर पाणी असल्याने योहान लोकांचा बाप्तिस्मा तेथे करीत असे. बाप्तिस्मा करुन घेण्यासाठी लोक तेथे येत असत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
योहानही शालिमजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा देत होता कारण तेथे पाणी मुबलक होते. लोक त्याच्याकडे येऊन बाप्तिस्मा घेत असत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योहानही शालिमाजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता योहान शालिमाजवळ असलेले एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तिथे विपुल प्रमाणात पाणी असून, लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी येत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि योहानदेखील शालिमाजवळ, एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता; कारण तेथे पाणी पुष्कळ होते आणि लोक तेथे येऊन बाप्तिस्मा घेत असत.