John 3:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून ते शिष्य योहानाकडे आले व म्हणाले, रब्बी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य तुमच्याबरोबर होता तो आठवतो? तुम्ही त्याच्याविषयी साक्ष देखील दिली. तो मनुष्य लोकांना बाप्तिस्मा देत आहे, व पुष्कळजण त्याच्याकडे जात आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते योहानकडे येऊन म्हणाले, “गुरुवर्य, पाहा, यार्देनच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे, तो आता बाप्तिस्मा देतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जात आहेत!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, पाहा, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे तो बाप्तिस्मा करतो, आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शिष्य योहानाकडे आले आणि म्हणाले, “गुरुजी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य आपल्याबरोबर होता व ज्यांच्याबद्दल आपण साक्ष दिली, ते बाप्तिस्मा करीत आहेत आणि पाहा, प्रत्येकजण त्यांच्याकडे जात आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते योहानाकडे येऊन त्यास म्हणाले, “रब्बी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्ष दिली तो बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत.”