John 3:29 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्याला वधू असते तो वर असतो, वरााला मदत करणारा वराचा मित्र वराची वाट पाहतो आणि वेगळया आवाजामुळे त्याच्या येण्याची चाहूल लागते काय, ते कान देऊन ऐकतो. वराची वाणी आली म्हणजे त्याच्या मित्राला आनंद होतो. तसाच आनंद मला वाटत आहे. आणि माझ्या आनंदाची वेळ आता आलेली आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
वधू ज्याची आहे, तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो, तो वराचा मित्र आहे. वराची वाणी ऐकून त्याला आनंद होतो. तशाच प्रकारे माझा आनंद पूर्ण झाला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वधू वराची असते. वराचा मित्र जवळ थांबून त्याचे भाषण ऐकतो, वराचा आवाज ऐकून त्याचा आनंद पूर्ण होतो, तो आनंद माझा आहे आणि आता तो परिपूर्ण झाला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.