John 4:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती म्हणाली, “महाराज, जिवंत पाणी तुम्हांला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे. आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जीवनदायक पाणी आपल्याजवळ कुठून येणार?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“महाराज,” ती स्त्री म्हणाली, “परंतु आपल्याजवळ पाणी काढण्यासाठी पोहरा नाही आणि विहीर तर खूप खोल आहे. हे जिवंत पाणी आपणाकडे कुठून येणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, पाणी काढायला आपल्याजवळ काही नाही व विहीर तर खोल आहे, मग आपल्याजवळ ते जिवंत पाणी कोठून?