John 4:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू तिला म्हणाला, “बाई, अशी वेळ येत आहे की, पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेममध्येही करणार नाहीत, हे माझे खरे मान.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू तिला म्हणाले, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येईल की त्यावेळी तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमात करणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू तिला म्हणाला, “मुली, माझ्यावर विश्वास ठेव की अशी घटका येत आहे; तुम्ही या डोंगरावर किव्हा यरूशलेम शहरात पित्याची उपासना करणार नाही,