John 4:47 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू यहूदीयातून आला आहे आणि आता तो गालीलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफर्णहूम तेथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली. कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू यहुदियातून गालीलमध्ये आला आहे, हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली, “आपण येऊन मरणास टेकलेल्या माझ्या मुलाला बरे करावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू यहूदीयातून गालीलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, “आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा.” कारण तो मरणाच्या पंथास लागला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू यहूदीयातून गालीलात आले आहेत, हे ऐकून तो त्यांच्याकडे गेला व आपण येऊन माझ्या मुलाला बरे करावे, अशी त्यांना आग्रहाने विनंती केली, कारण तो मुलगा मृत्युशय्येवर होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली कारण तो मरायला टेकला होता.