John 4:53 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तुझा मुलगा वाचेल” असे एक वाजण्याच्या सुमारासच येशूने सांगितले होते, हे त्या मुलाच्या वडिलांना माहीत होते. म्हणून त्याने व त्याच्या घरातील सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यावरून ज्या वेळी येशूने त्याला सांगितले होते की, ‘तुमचा मुलगा वाचला आहे’, त्याच वेळी हे झाले, हे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने येशूवर विश्वास ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्या पित्याला उमगले की त्याच घटकेस येशूंनी, “तुझा मुलगा जगेल तो मरणार नाही.” हे शब्द उच्चारले होते. मग तो व त्याच्या संपूर्ण कुटुंबाने येशूंवर विश्वास ठेवला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.