John 4:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहीरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे याकोबची विहीर होती. प्रवासाने दमलेला येशू त्या विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झर्यावर बसला; तेव्हा सुमारे सहावा तास होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे याकोबाची विहीर होती. येशू, प्रवासाने थकलेले याकोबाच्या विहिरीजवळ बसले. ती भर दुपारची वेळ होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे याकोबाची विहीर होती. म्हणून प्रवासाने दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते.