John 4:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती शोमरोनी स्त्री म्हणाली, “तुम्ही यहूदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.” (यहूदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. )
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहुदी असताना माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला मागता हे कसे?” (कारण यहुदी लोक शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसत.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यांना म्हणाली, “आपण यहूदी आहात व मी एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही मजजवळ पाणी कसे मागू शकता?” (कारण यहूदी लोक शोमरोनी लोकांशी संबंध ठेवीत नसत.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यास म्हणाली, “आपण यहूदी असून माझ्यासारख्या एका शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर कोणतेही व्यवहारीक संबंध ठेवत नव्हते.