John 5:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यावरुन यहूदी लोकांचा येशूला जिवे मारण्याचा पक्क ा निश्चय झाला. ते म्हणाले, “पहिली गोष्ट ही की, येशू शब्बाथासंबंधीचा नियम मोडतो. दुसरे, ‘देव माझा पिता आहे!’ असे तो म्हणाला. तो स्वत:ची देवाशी बरोबरी करतो”.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यामुळे त्याला ठार मारावे म्हणून यहुदी लोक अधिकच प्रयत्न करू लागले; कारण तो साबाथ मोडत असे. इतकेच नव्हे, तर देवाला आपला पिता संबोधून स्वतःला देवासमान मानत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे तर यहूदी त्याला जिवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडत असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या कारणासाठी तर यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यास अधिकच आतुर झाले; कारण त्यांनी शब्बाथ मोडला होता, एवढेच नव्हे, तर त्यांनी परमेश्वराला आपला पिता म्हणून स्वतःला परमेश्वरासमान केले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यामुळे तर यहूदी त्यास जीवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले, कारण त्याने शब्बाथ मोडला एवढेच नाही, पण देवाला स्वतःचा पिता म्हणून त्याने स्वतःला देवासमान केले होते.