John 5:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. पुत्र जरी सर्व करु शकत असला, तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करु शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करेतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो, त्याच्यावाचून त्याला स्वतःहून काहीही करता येत नाही; कारण जे काही पिता करतो, ते पुत्रही तसेच करतो;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले: मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही; कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी त्यांना असे उत्तर दिले: “मी तुम्हाला निश्चित सांगतो, पुत्राला स्वतः होऊन काही करता येत नाही; तो पित्याला जे काही करताना पाहतो, तेच तो करतो, कारण जे काही पिता करतो, तेच पुत्रही करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावरुन येशूने त्यांना उत्तर दिले; “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून काहीही त्यास स्वतः होऊन करता येत नाही; कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो.