John 5:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी एकटा काहीच करु शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वत:च्या समाधानासाठी नाही; परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मला स्वतःहून काही करता येत नाही. जसे मी ऐकतो, तसा मी न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले, त्याच्या इच्छेप्रमाणे करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला स्वत: होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी स्वतःहून काही करू शकत नाही; मी ऐकतो त्याप्रमाणे न्याय करतो आणि माझा निर्णय योग्य आहे, कारण मी स्वतःस खुश करू इच्छित नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांना खुश करू पाहतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला स्वतः होऊन काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा योग्य आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.