John 5:44 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्हांला एकमेकांकडून स्तुति करवून घ्यायला आवडते. परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुति मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही, मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हांला श्रद्धा ठेवता येणे कसे शक्य आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा स्वीकारता परंतु जो एकच परमेश्वर, त्यांच्याकडून प्रशंसा मिळविण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हाला विश्वास तरी कसा ठेवता येईल?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव आहे त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हास विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?