John 5:45 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी पित्यासमोर उभा राहून तुम्हांला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमजे चुकते असे मोशेच तुम्हांला म्हणतो, आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हांला आशा आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन, असे समजू नका. ज्याची तुम्ही आशा बाळगता, तो मोशे तुम्हांला दोष लावील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन असे समजू नका; ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हांला दोष लावणार आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु मी पित्यासमोर तुम्हाला दोषी ठरवेन असा विचार करू नका. कारण ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशेच तुम्हाला दोषी ठरवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पित्यासमोर तुमच्यावर आरोप करीन, असे मानू नका. तुम्ही ज्याच्यावर आशा ठेवता तो मोशेच तुमच्यावर आरोप लावणार आहे;