John 6:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” ती बरीच गवताळ अशी जागा होती. तेथे खाली बसलेले सुमारे पाच हजार पुरुष होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते म्हणून सर्व लोक बसले. तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी म्हटले, “लोकांना खाली गटागटाने बसावयास सांगा.” त्या ठिकाणी भरपूर गवत होते व ते खाली बसले. तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू म्हणाला, “लोकांस बसवा.” त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले.