John 6:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग येशूने त्या भाकरी हातात घेतल्या; येशूने भाकरीबद्दल देवाचे उपकार मानले आणि त्या तेथे बसलेल्या लोकांना दिल्या. मासे घेऊन त्याने तसेच केले. येशूने लोकांना पाहिजे तितके खाऊ दिले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने त्या भाकरी घेतल्या; आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्यांना वाटून दिल्या; तसेच त्या मासळ्यांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येशूंनी त्या भाकरी घेतल्या, आभार मानले व जे बसले होते ते खाऊन तृप्त होईपर्यंत वाटल्या. त्यानंतर मासळ्यांचेही त्यांनी तसेच केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले.