John 6:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपण राजा बनावे असे लोकांला वाटते हे येशूला माहीत होते. येशूला आपला राजा करावे असा बेत लोकांनी केला. तेव्हा येशू तेथून निघून एकटाच डोंगराळ भागात गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर लोक येऊन आपल्याला राजा करण्याकरता बळजबरीने धरून नेण्याच्या बेतात आहेत, हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोक आपल्याला जबरदस्तीने राजा करण्याच्या उद्देशाने आले आहेत हे येशूंना माहीत होते, तेव्हा ते पुन्हा एकटेच डोंगरावर निघून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.