John 6:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोकांनी पाहिले. म्हणून लोक नावांमध्ये बसले आणि कफर्णहूमला गेले. त्यांना येशूला शोधायचे होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत, असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्या लहान मचव्यांत बसून येशूचा शोध घेत कफर्णहूमला आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यांत बसून येशूचा शोध करत कफर्णहूमास आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
समुदायाच्या लक्षात आले की येशू आणि त्यांचे शिष्य तिथे नाहीत, हे पाहून ते नावेमध्ये बसून येशूंच्या शोधार्थ कफर्णहूमास निघाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नव्हते हे जेव्हा लोकांनी बघितले तेव्हा त्यांनीही होड्या घेतल्या व येशूला शोधीत ते कफर्णहूमला आले.