John 6:58 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपल्या वाडवडिलांनी अरण्यांत जी भाकर खाल्ली, त्या भाकरीसारखा मी नाही. त्यांनी ती भाकर खाल्ली परंतु इतर सर्व लोकांप्रमाणेच ते मरुन गेले. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. जो कोणी ही भाकर खाते तो अनंतकाळ जगेल.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्वर्गातून उतरलेली भाकर ती हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली, तरी ते मरण पावले. हे मात्र तसे नाही. ही भाकर जो खातो, तो सर्वकाळ जगेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय; तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही; ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मरण पावले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.”