John 7:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो कोणी स्वत:च्या कल्पना शिकवितो, तो स्वत:ला मानसन्मान मिळावा असा प्रयत्न करतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो. त्याचे काहीच खोटे नसते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो आपल्या स्वतःचे बोलतो तो स्वतःचा गौरव करू पाहतो. परंतु आपल्याला ज्याने पाठवले त्याचा गौरव जो करू पाहतो, तो प्रामाणिक आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव पाहतो; परंतु ज्याने त्याला पाठवले त्याचा गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी स्वतःचे विचार मांडतो तो स्वतःचे गौरव करतो, परंतु जो ज्याने त्याला पाठविले त्याला गौरव मिळावे म्हणून बोलतो, तो मनुष्य खरा आहे; व त्याच्यात खोटेपण नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.