John 7:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशेने तुम्हांला सुंतेचा नियम दिला. परंतु खरे पाहता सुंता मोशेपासून आलेली नाही. ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. म्हणून कधी कधी शब्बाथ दिवशीही तुम्ही मुलांची सुंता करता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मोशेने तुम्हांला सुंता करण्याचा आदेश दिला (जरी ती मोशेपासून नव्हे, तर पूर्वजांपासून सुरू झाली) व तुम्ही साबाथ दिवशी माणसाची सुंता करता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशेने तुम्हांला सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही तर पूर्वजांपासून आहे) व शब्बाथ दिवशी तुम्ही माणसांची सुंता करता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेने तुम्हाला सुंतेचा नियम दिला तरी, ही प्रथा मोशेद्वारे आली नसून, पूर्वजांपासून आलेली आहे, त्यानुसार तुम्ही मुलाची सुंता शब्बाथ दिवशी करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशेने तुम्हास सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही, पण पूर्वजांपासून आहे.) आणि तुम्ही शब्बाथ दिवशी मनुष्याची सुंता करता.