John 7:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बाथ दिवशीही बालकाची सुंता करता येते. मग मी शब्बाथ दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मोशेचा नियम मोडला जाऊ नये ह्याकरता मनुष्याची सुंता जर साबाथ दिवशीदेखील केली जाते, तर मी साबाथ दिवशी एका मनुष्याला पूर्णपणे बरे केले म्हणून तुम्ही माझ्यावर रागावता काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला अगदी बरे केले ह्यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून मुलाची सुंता जर शब्बाथ दिवशी करता, मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला पूर्ण स्वास्थ्य दिले तर माझ्यावर का रागावता?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर, तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्यास अगदी बरे केले यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय?