John 7:28 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता. येशू म्हणाला, “होय, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हांला माहीत आहे. परंतु मी स्वत:च्या अधिकाराने आलो नाही. जो खरा देव आहे त्याने मला पाठविले. तुम्ही त्याला ओळखीत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर मंदिरात शिकवण देत असता येशूने आवर्जून म्हटले, “तुम्ही मला ओळखता व मी कुठला आहे, हेही तुम्हांला ठाऊक आहे. तथापि मी आपण होऊन आलो नाही, पण ज्याने मला पाठवले तो सत्यस्वरूपी आहे आणि त्याला तुम्ही ओळखत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे. तरीपण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकून मंदिराच्या आवारात, शिकवीत असताना, येशू मोठ्याने म्हणाले, “होय, मी कोण, कुठला हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे. तरी मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने येथे आलो नाही, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे; त्यांना तुम्ही ओळखीत नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावरुन येशू परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरीही मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्यास तुम्ही ओळखत नाही.