John 8:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू मांदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला. ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटीजवळच तो होता. परंतु येशूला कोणी अटक केली (पकडले) नाही. कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मंदिरात शिकवत असताना दानपेट्या ठेवण्याच्या खोलीत तो ही वचने बोलला. परंतु त्याला कोणी अटक केली नाही कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मंदिरात शिकवत असता ही वचने जामदारखान्यात बोलला; तरी त्याला कोणी धरले नाही, कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या अंगणाच्या जवळ जिथे दानार्पण टाकीत असत तिथे शिकवीत असताना ते ही वचने बोलले, तरीसुद्धा त्यांना कोणीही धरले नाही, कारण त्यांची वेळ तेव्हापर्यंत आली नव्हती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो परमेश्वराच्या भवनात शिकवीत असताही वचने जामदारखान्यात बोलला; पण कोणीही त्याच्यावर हात टाकले नाहीत, कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.