John 8:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. मी तुमचा न्याय करु शकतो. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो. आणि तो सत्य सांगतो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे. ज्याने मला पाठवले तो सत्य आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्याच मी जगापुढे जाहीर करतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे; परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला तुमचा न्याय करण्याबाबत बरेच काही बोलायचे आहे. परंतु ज्यांनी मला पाठविले, ते विश्वसनीय आहेत आणि जे मी त्यांच्यापासून ऐकले आहे, तेच जगाला सांगतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो.”