John 8:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण अब्राहामाने जे केले नाही ते तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत तर तुमचा पिता अब्राहाम नसून कोणी वेगळा आहे.” परंतु यहूदी म्हणाले, “ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही! देव आमचा पिता आहे. तोच एक आमचा पिता आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही तुमच्या बापाची कृत्ये करता.” ते त्याला म्हणाले, “परमेश्वर स्वतः आमचा पिता आहे. आम्ही त्याची खरी मुले आहोत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता.” ते त्याला म्हणाले, “आमचा जन्म जारकर्मापासून झाला नाही. आम्हांला एकच पिता म्हणजे देव आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही तुमच्या स्वतःच्या पित्याची कामे करीत आहात.” तेव्हा ते विरोध करीत म्हणाले, “आम्ही बेवारस संतती नाही, आमचा खरा पिता प्रत्यक्ष परमेश्वरच आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही आपल्या पित्याच्या कृत्ये करता.” ते त्यास म्हणाले, “आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे.”