John 8:54 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशूने उत्तर दिले, “जर मी स्वत:च स्वत:चा सन्मान केला तर त्या सन्मानाला काहीच अर्थ नाही. माझा पिता माझा सन्मान करतो. तो आमचा देव आहे असे तुम्ही म्हणता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने उत्तर दिले, “मी माझा स्वतःचा गौरव केला, तर त्याला काही अर्थ नाही. माझा गौरव करणारा माझा पिता आहे व त्याच्याविषयी ‘तो आमचा देव आहे’, असे तुम्ही म्हणता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने उत्तर दिले, “मी माझा स्वतःचा गौरव केला तर तो माझा गौरव काहीच नाही; माझा गौरव करणारा माझा पिता आहे; तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा येशूंनी त्यांना सांगितले, “मी स्वतः आपले गौरव केले, तर ते व्यर्थ आहे. परंतु माझा गौरव करणारे माझे पिता आहेत आणि त्यानांच तुम्ही आपला परमेश्वर मानता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने उत्तर दिले, “मी स्वतःचे गौरव केले तर माझे गौरव काहीच नाही, माझे गौरव करणारा माझा स्वर्गीय पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता.