John 9:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या मनुष्याने उत्तर दिले. “लोक ज्याला येशू म्हणतात त्याने थोडा चिखल केला. त्याने तो चिखल माझ्या डोळ्यांवर लावला. मग येशूने मला शिलोह तळ्याकडे जाऊन धुण्यास सांगितले. म्हणून मी शिलोह तळ्यावर जाऊन डोळे धुतले. आणि मग मला दिसू लागले.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने माती ओली करून माझ्या डोळ्यांना लावली आणि मला सांगितले, ‘शिलोहवर जाऊन धुऊन घे.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांना लावला आणि मला सांगितले, ‘शिलोह तळ्यावर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्याने सांगितले, “येशू नावाच्या एका मनुष्याने चिखल केला आणि माझ्या डोळ्यांवर लावला. मग मला शिलोआमाच्या तळ्यावर जाऊन चिखल धुण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी जाऊन धुतले व मला दृष्टी प्राप्त झाली.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांस लावला आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहवर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले.”