John 9:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून आता परुशी लोक त्या मनुष्याला विचारु लागले, “तुला कसे काय दिसू लागले?” त्या मनुष्याने उत्तर दिले, “त्याने माझ्या डोळ्यांवर चिखल लावला. मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून परुश्यांनीदेखील त्याला पुन्हा विचारले, “तुला दृष्टी कशी मिळाली?” तो त्यांना म्हणाला, “येशूने माझ्या डोळ्यांना ओली माती लावली, ती मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून परूश्यांनीही त्याला पुन्हा विचारले, “तुला दृष्टी कशी आली?” तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला. तो मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यास्तव परूश्यांनीही त्याला दृष्टी कशी आली हे विचारले. तेव्हा तो मनुष्य उत्तरला, “त्यांनी माझ्या डोळ्यांवर चिखल लावला आणि मी तो धुऊन टाकला आणि आता मी पाहू शकतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून परूश्यांनीही त्यास पुन्हा विचारले. “तुला कसे दिसू लागले?” आणि तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला, तो मी धुऊन टाकल्यावर, मला दिसू लागले.”