John 9:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच आंधळे (समज नसलेले) असता, तर तुम्ही पापाबद्दल दोषी ठरला नसता. परंतु ‘आम्हांस दिसते’ असे तुम्ही म्हणता (तुम्ही काय करता हे जाणता) म्हणून तुम्ही दोषी आहात.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्हांला दोषी ठरवण्यात आले नसते, परंतु तुम्हांला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हांला पाप नसते; परंतु आम्हांला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू म्हणाले, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्ही पापी नसता; परंतु तुम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हास पाप नसते, परंतु तुम्ही म्हणता की, ‘आम्हास आता दिसते’, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.”