John 9:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग येशूने त्या मनुष्याला सांगितले, “जाऊन शिलोह तळ्यात डोळे धू.” (शिलोह म्हणजे पाठविलेला) म्हणूने तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला. त्याने डोळे धुतले आणि तो परत आला, तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि त्याला म्हटले, “जा, शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यावर तुझा चेहरा धुऊन घे.” त्याने जाऊन त्याचा चेहरा धुतला. त्याला दिसू लागले व तो परत आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याला म्हटले, “जा; शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यात धू.” मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जा, ते त्याला म्हणाले, शिलोआम तळ्यात डोळे धू.” (शिलोआम म्हणजे पाठविलेला.) तेव्हा तो मनुष्य गेला व त्याने डोळे धुतले आणि डोळस होऊन घरी गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यास म्हटले, “जा, शिलोहाच्या तळ्यात धू.” (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला.