Jonah 1:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्या माणसांना योनाला समुद्रात फेकावे असे वाटत नव्हते. त्यांनी गलबत पुन्हा किनाऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही. वारा प्रचंड होता समुद्रही खवळलेला होता. आणि वादळाची तीव्रता वाढतच होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जहाज किनार्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ही मारमारून थकली, पण त्यांना ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिकाधिक खवळत चालला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीही खलाश्यांनी जहाज किनाऱ्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत, कारण समुद्र पूर्वीपेक्षा जास्त उग्र होत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीसुध्दा त्या मनुष्यांनी जहाज किनाऱ्यास आणण्यासाठी खूप प्रयत्नाने वल्हविले; परंतु ते काही करू शकत नव्हते, कारण समुद्र त्यांजवर अधिकाधिक खवळत चालला होता.