Joshua 1:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“छावाणीतून फिरुन लोकांना अत्र वगैरेची तयारी करुन सज्ज व्हायला सांगा. तीन दीवसाच्या आत आपल्याला यार्देन नदी पार करायची आहे. परमेश्वर देव देत आहे तो देश ताब्यात घ्यायला आपण निघत आहोत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“छावणीतून फिरून लोकांना असा हुकूम द्या की, ‘आपली भोजनसामग्री तयार करा, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हांला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसांच्या आत तुम्हांला ही यार्देन ओलांडायची आहे.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“छावणीमधून जा आणि लोकांना सांगा, ‘तुमची अन्नसामुग्री तयार ठेवा. आतापासून तीन दिवसात तुम्ही येथून यार्देन नदी पार करून जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहेत, त्याचा ताबा घ्याल.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“छावणीतून फिरून लोकांस अशी आज्ञा द्या की, स्वतःसाठी अन्नसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे.”