Joshua 1:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वराचा सेवक मोशे याने काय सांगितले त्याची आठवण करा परमेश्वर देव तुम्हाला विसाव्याचे स्थान देणार असल्याचे त्याने सांगितले. परमेश्वर तो देश तुम्हाला देणार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हांला जी आज्ञा दिली होती तिचे स्मरण करा; तो तुम्हांला म्हणाला होता की, ‘तुम्हांला स्वास्थ्य मिळावे म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हांला देणार आहे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याहवेहचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेची आठवण ठेवा, नंतर तो म्हणाला, ‘तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर हा प्रदेश तुम्हाला देतील.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिची आठवण करा, तो तुम्हाला म्हणाला होता की, तुम्हाला विसावा मिळावा म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देत आहे.