Joshua 10:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण तुम्ही स्वत:तेथे थांबून राहू नका. शत्रूंचा पाठलाग करून त्यांच्यावर मागून हल्ला करत राहा. शत्रूला त्यांच्या नगरात परतू देऊ नका. कारण तुमच्या परमेश्वर देवाने तुम्हाला विजय मिळवून दिला आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका, आपल्या शत्रूंचा पाठलाग करा, त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांना पोहचू देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण थांबू नका; शत्रूचा पाठलाग चालू ठेवा! त्यांच्यावर मागून हल्ला करा आणि त्यांना त्यांच्या शहरांकडे जाऊ देऊ नका, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी त्यांना तुमच्या हातात दिले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.