Joshua 10:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
व यहोशवासमोर हजर केले. यहोशवाने आपल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलावले. आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांना तो म्हणाला “पुढे व्हा आणि या राजांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा अधिकाऱ्यांना जवळ येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल पुरुषांना बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर स्वारीवर गेलेल्या योद्ध्यांच्या नायकांना म्हणाला, “पुढे येऊन ह्या राजांच्या मानांवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानांवर पाय दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा त्या पाच राजांना बाहेर काढून यहोशुआ पुढे हजर करण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली पुरुषांना बोलाविले. मग त्याच्यासोबत आलेल्या सेनेच्या अधिकार्‍यांना तो म्हणाला, “इकडे या व आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवा.” तेव्हा ते पुढे आले आणि त्यांनी आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेनानायकांना म्हणाला, “पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.