Joshua 10:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या दिवशी यहोशवाने मक्केदाचा पराभव केला. तेथील राजा आणि नगरातील लोक यांना यहोशवाने ठार केले. कोणीही वाचला नाही. यरीहोच्या राजाची केली तीच गत यहोशवाने मक्के दाच्या राजाचीही केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्याचा व त्याच्या राजाचा संहार केला; त्यांच्याबरोबरच तेथल्या सगळ्या प्राण्यांचाही त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही; त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच दिवशी यहोशुआने मक्केदा या शहराचा नाश केला आणि त्या शहराचा राजा व त्यातील प्रत्येकाचा तलवारीने संहार केला. एकही व्यक्ती जिवंत ठेवण्यात आली नाही. त्याने यरीहोच्या राजाचे केले तसेच मक्केदाच्या राजाचेही केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला; त्यांच्याबरोबर तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.