Joshua 10:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला, “आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका आमच्या मदतीला या. विनाविलंब आमचे रक्षण करा. डोंगराळ प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरला मदतीचा हात आखडता घेऊ नकोस; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहोशुआ जो गिलगालच्या छावणीत होता, त्याच्याकडे गिबोनाच्या लोकांनी निरोप पाठवून म्हटले: “आमचा त्याग करू नका. आमच्याकडे लवकर येऊन आम्हाला वाचवा! आमची मदत करा, कारण डोंगरवटीच्या सर्व अमोरी राजांनी आमच्याविरुद्ध आपले सैन्य उभारले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे पाहून गिबोनातल्या मनुष्यांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरील मदतीचा हात काढून घेऊ नको; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.