Joshua 11:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने आपला सेवक मोशे याला फार पूर्वीच ही आज्ञा दिली होती. नंतर मोशेने हे यहोशवाला सांगितले होते. यहोशवाने परमेश्वराचे ऐकले. परमेश्वराने मोशेला सांगितले ते ते सर्व यहोशवाने न चुकता केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले; परमेश्वराने मोशेला आज्ञापिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण याहवेहने आपला सेवक मोशेला अशीच आज्ञा दिली होती; आणि मोशेने ही आज्ञा यहोशुआला दिली व यहोशुआने जसे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे केले; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे त्याने काळजीपूर्वक पालन केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली; आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. यहोशवाने मोशेला आज्ञा दिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.