Joshua 12:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेशाचा इस्राएल लोकांनी ताबा घेतला होता.आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत आणि यार्देन खोऱ्याच्या पूर्वेकडील सर्व भूभाग त्यांचा होता. त्यासाठी इस्राएल लोकांनी ज्या ज्या राजांचा पराभव केला ते असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या राजांना ठार मारून त्यांचे यार्देनेपलीकडे उगवतीकडील आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वेकडील सर्व इस्राएल लोकांनी काबीज केले ते राजे हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यार्देन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत: