Joshua 12:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेशबोन नगरात राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन. आर्णोन खोऱ्याजवळच्या अरोएर पासून यब्बोक नदीपर्यंतच्या प्रदेशावर त्याची सत्ता होती. त्या खोऱ्याच्या मध्यापासून त्याची हद्द सुरु होत असे. अम्मोन्यांची सीमा याला लागून होती. गिलादच्या अधर्या प्रदेशावर सीहोनची सत्ता होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमोर्यांचा हेशबोननिवासी राजा सीहोन; आर्णोन खोर्याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोर्याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.