Joshua 12:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यार्देन नदीच्या पूर्वेला गालिली सरोवरापासून अराबाच्या समुद्रापर्यंत (मृत समुद्र) एवढ्या भागावर त्याचे राज्य होते. तसेच बेथ-यशिमोथपासून दक्षिणेस पिसगा टेकड्याच्या उत्तरणीपर्यंतचा भाग त्याच्याच हद्दीत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अराबाच्या पूर्वेकडील भागावर सुद्धा त्याने राज्य केले, तसेच किन्नेरेथ समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र), बेथ-यशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत राज्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, अराब समुद्राच्या पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंतसुद्धा सीहोन राज्य करत असे.