Joshua 12:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यार्देनच्या पश्चिमेकडील देशांतील राजांचा पराभव इस्राएल लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली केला. मग तो देश बारा वंशांमध्ये विभागून यहोशवाने इस्राएल लोकांना दिला. परमेश्वराने द्यायची कबूल केलेली हीच ती भूमी. लबानोन खोऱ्यातील बालगाद आणि सेईर जवळचा हालाक डोंगर यांच्या मधला हा भाग होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोर्यातील बाल-गादापासून सेईरास जाणार्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्राएल लोक ह्यांनी मोड केला ते हे: (हा देश यहोशवाने इस्राएलवंशांना त्यांच्या हिश्शांप्रमाणे वतन म्हणून दिला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यार्देनेच्या पश्चिमेस असलेल्या लबानोन खोर्यातील बआल-गादपासून व सेईरास जाणार्या हालाक डोंगरापर्यंतच्या ज्या देशांच्या राजांवर यहोशुआ व इस्राएली लोकांनी विजय मिळविला ते हे आहेत. यहोशुआने त्यांचे प्रदेश इस्राएलांच्या गोत्रांना त्या गोत्रांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल-गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते आणि ज्यांना यहोशवा व इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला,